Powered By Blogger

विजय लोकशाहीचा परंतु व्यथा विचारसरणीची

विजय लोकशाहीचा परंतु व्यथा विचारसरणीची

"मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही".  या उक्तीला पुरेपूर जागणारे, मराठा साम्राज्याचे आराध्या दैवत, क्ष्यत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता त्यांनी जिंकलेल्या गड - किल्ल्यातून निर्माण करतात.
हे फक्त दगड मातीने उभारलेले किल्ले नसून यातून माझ्या राज्याची ओळख तयार होते, महाराष्ट्राचं अस्तित्व निर्माण करण्याचं श्रेय जितकं छत्रपतींना जात त्यांच्या मावळ्यांच्या सांडलेल्या रक्ताला दिलं जात, तितकाच श्रेयाचा वाटा या गड - किल्ल्यांचा आहे. आणि आज हे सरकार या अस्मितेला भाडेतत्त्वावर देण्याची भाषा करतात, जीभ तरी कशी धजावते या राजकारन्यांची हा विचार बोलताना. या एतीहासिक वास्तूच्या एक एक बुरुज दरवाजा स्वराज्य रक्षक मावळ्यांच्या रक्ताने रंगलाय, त्याच जतन करायचा विचार सोडून सरकार त्या वास्तूला पैसा कमावण्यासाठी साधन बनवू पाहतेय हे कदापि सहन होऊ शकणार नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासाला कागदी पैस्यांच्या किमतीत मोजू पाहणारे सरकार आज लोकशाही ची ताकत अनुभवेल, आज माझी लोकशाही जिंकेल, आज पुन्हा ती वेळ येते हे बोलायची की 'सरकारच डोकं ठिकाणावर आहे काय ?'
हा निर्णय जनतेचा रोष ओढवून घेईल याची जाणीव सरकारला असायला हवी होती !
आज महाराष्ट्राच्या जनतेने प्रखर विरोध करत हा निर्णय थांबवला खरं परंतु या सगळ्या घटनेतून एक बाब लक्षात येते की माझ्या युवा पिढीला पेटवण्यासाठी धार्मिक - जातीवादी विषयच का लागतात ? सरकारच्या बाकी काही निर्णयांवर आमची पिढी त्यांचं मत का मांडत नाही? का त्या प्रत्येक निर्णयच विश्लेषण करून पाहत नाही जे धार्मिक अथवा जातीवादी जरी  नसले तरी ते भारतीय लोकशाहीला तडा जाऊ देणारे असतात ? उदाहणादाखल; माहितीचा अधिकार कायदा भारत सरकारने सुधारित केला आणि नकळतपणे त्या कायद्याचा भक्कम पाया भुसभुशीत केला, त्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या हाताची कटपुटली करून सोडलं. नावरुपी राहिलेला माहितीचा अधिकार कायदा यावर विश्वास ठेवावा कसा हा प्रश्न आहे .
आज आम्ही राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या निर्णयाची चौकशी हमखास करू पण लोकशाहीला बळकटी देणारे कायदे बुजरे केले जात आहेत याकडे मात्र आमचं दुर्लक्ष ! खरतर माझ्या राष्ट्राला जातीधर्माच्या विविधतेच्या जाळ्या ने  इतकं जखडल आहे की आज काळाची गरज असलेली लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य असले पाहिले हे माझ्या युवा पिढीला समजत नाही.
आज कळकळीने सांगावस वाटत की संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, एकात्मता  आणि मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्तवानुसार जगून बघा. माणुसकीच्या धर्माने प्रत्येक भारतीय जर राष्ट्राच्या उद्घराकराता कष्ट करेल तर महासत्ता होण्याची वाटचाल याच मार्गाने होऊ शकते यात काही गैर नाही. आता वेळ आलीय जातपात धर्म वंश या जाळ्यातून स्वप्रयत्नांनी मुक्त होऊन संवैधानिक विचारसरणी जोपासण्याची. हाच खरा मार्ग आहे विकासाची स्वप्न साकारण्याचा.

जय भारत🇮🇳

 ✍️Future of Tommorow India.

जबाबदार नागरिक

नक्की वाचा

हो, आपल्याला वेड्यात काढले आणि आपण वेडयात निघालो. आता महाराष्ट्रात इलेक्शन आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे बरेचसे नेते शिवसेना बीजेपी मध्ये चालले.
 आणि हो  2014 च्या इलेक्शन मध्ये ह्याच नेतेमंडळीनी आमदार-खासदार यांनी भ्रष्टाचार केला होता, राष्ट्रवादी काँग्रेसने देश लुटला होता. ह्याच पार्टीमधील लोकांनी देश लुटला ना मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सोडून तुम्ही त्यांना तुमच्या पक्षात घेतात , किती लाजिरवाणी गोष्ट आहे. दोन-तीन लोकांना काय जेलची हवा दाखवली तर तुम्ही धुतलेल्या तांदळाचे का ? तुमच्याकडे काय वॉशिंग मशीन आहे का भ्रष्टाचारी लोकांना चांगले करायचे ?
याचा अर्थ असा कि,कोणताही पक्ष आपल्या स्वार्थासाठी काहीपण करू शकतो , कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि हेच  आपला मेंदू गुडघ्यात ठेवणारे , विकलेले टीव्ही चॅनेल्स आपला brain वॉश करतात,धर्माच्या नावाने माणसाला emotional करतात.
यावरून Please तुम्ही असे नका समजू की मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलतोय,जी खरी रियालिटी आहे ती तुमच्यासमोर ठेवतोय. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे आता आपल्याला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 73 वर्ष झाले, आपला देश महासत्ता होन्याकडे वाटचाल करतोय पण हे राजकरणी कार्यकर्ते आपल्याला अंधारात ठेवत आहे. आपल्या गावाचा विकास ,आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यसाठी, आपला आर्थिक सामाजिक  विकास करण्यासाठी इलेक्शन आहे. देशासाठी मोदींना निवडून दिले हे योग्य पण हे सरकार  परत मोदीच्या नावानी तुम्हाला फूस लावेल,पंतप्रधान काय तुमच्या गावात विकास कामे घेऊन नाही येणार हे काम करायला योग्य माणूस, लायकी असलेला उमेदवार पाहिजे. त्याला कुठे काय योग्य आहे ते समजले पाहिजे.  योग्य उमेदवाराला निवडून द्या, तोच आपल्या देशासाठी काही कल्याणकारी कामे करेल. फक्त आमदारांनी ग्रीन जिम बांधली किंवा आमच्या समाजासाठी काही केले किंवा स्मशानभूमी बांधली म्हणून निवडून नका देऊ.
आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र या.जातपात, धर्म - वंश , विशिष्ट व्यक्तीचे नाव घेऊन , हातात झेंडा घेऊन राजकारण करणारे ह्या मूर्ख लोकांना घरचा रस्ता दाखवा.असा उमेदवार ज्याला खरच  लोकांचा विकास समजतो त्याला निवडून द्या.
जसे शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे आणि योग्य त्या रस्त्यावर आणून ठेवने हे असते तसेच लोकप्रतिनिधी चे काम लोकांची सेवा करणे आणि सर्वांगीण विकास करणे हे असते.

सध्याची सामान्य व्यक्तींची व्यथा, जो प्रामाणिक पणे कर भरतो :-
1)रस्ते चांगले नाही,खड्ड्यात रस्ते.(लोकप्रतिनिधी ना फंड कसा आणायचा तेच माहीत नसते किंवा बोलता नाही येत सभेत आणि जरी आणला तरी यांना टक्केवारी द्यावी लागते).
2)महामंडळाच्या बस मधून एवढा काळा धूर  बाहेर येतो की त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम म्हणजे इन्डायरेक्ट आपले आयुष्य कमी होतय.(तिकीट एवढे घेता तरी सुविधा नाही,आणि हवा प्रदूषण सरकार च करतय किती पण पॅरिस परिषदा केल्या तरी फायदा नाही होणार).
3) स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी मुले निस्वार्थी पणे दिवस-रात्र अभ्यास करतात आणि त्यांच्या पदरात काय पडते तर पेपर फुटला, ग्रुपमध्ये पेपर देतांना विडिओ वायरल,एवढे पैसे द्या जागा फिक्स.(Proper प्लॅंनिंग नाही स्पर्धा परीक्षांची,योग्य तो व्यक्ती चांगल्या ठिकाणी जात नाही त्यामुळे देशाचे नुकसान होते)
4) पाण्यासाठी आज अर्धा महाराष्ट्र वणवण करतोय.(जलसंधारण बाबत योग्य त्या उपाययोजना नाही)(नीती आयोग चा लेटेस्ट रिपोर्ट वाचा)
5)बाहेरच्या दुनियेत बघितले तर आमच्याच जिवावर घर भरणारे, मजा करणारे पुढारी लोक आणि यांची मुल नवीन नवीन मोबाईल-महागड्या गाड्या घेतात आणि गुंडगिरी करतात आणि आपली मुलं बेरोजगारी, दुष्काळ सोसतो ? आणि हो यांची शेती एका वर्षांत एवढं उत्पन्न घेते की करोडो मधी... आणि आपली शेतीत तर भांडवल सुद्धा निघत  नाही?
 खरा प्रॉब्लेम कुठे तेच समजत नाही.
का डोळयांसमोर अन्याय सहन करायचा?
का आपण त्यांना त्यांची लायकी दाखवून नाही देत ?

का???

मी पुन्हा एकदा आवर्जून नमूद करेल की हे लिखाण एका सामान्य भारतीय नागरिकाने लिहिला आहे ज्याचा कोणत्याही राजकारणी पक्षाशी राजकारणी व्यक्तीशी संपर्क संबंध नाही.
एक जबाबदार नागरिक या नात्याने मी माझ्या राष्ट्राच्या युवकांना जागृत करण्यासाठी मदत करू इच्छितो.
तरी सर्वांनी यावर स्वतः विचार करून तुम्हाला योग्य वाटेल ते निर्णय घेऊन भारतीय महासत्ता घडवायला योगदान करा.

जय भारत🇮🇳

देशासाठी काही करावेसे वाटत असेल तर सर्वांनी एकत्र येऊया,एक साखळी तयार करूया अन्यायविरुद्ध लढण्यासाठी.


Read Previous Blog:

1)कसे जगावे.....??? https://sanketgaikwad1.blogspot.com/2019/05/blog-post_22.html

2)निवडणूक आणि आपण https://sanketgaikwad72.blogspot.com/2019/04/blog-post_21.html

3)जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव 2019 https://sanketgaikwad72.blogspot.com/2019/04/blog-post.html

4)I am the change 🇮🇳 https://sanketgaikwad1.blogspot.com/2019/05/i-am-change.html

कसे जगावे.....???


आत्तापर्यंत मला जे नाही मिळाले ते मिळविण्यासाठी आतापर्यंत मी जे नाही केले ते प्रयत्न मला करायचे आहे. यशाच्या शोधात,चिकाटी ही एक निश्चितच गुरुकिल्ली आहे.

         एक कल्पना करा,आज दिवसभर तुम्ही खूप काम केले,कामामध्ये तुम्ही एवढे व्यस्त होते,की तुम्ही जेवण करायचे विसरले.रात्री पण न जेवताच झोपी गेले.दुसऱ्या दिवशी उठला तुम्हांला खूप भूक लागली,पोटातून आवाज येतोय,तुम्ही खरच उपाशी आहेत.तुम्ही तुमचे रेफ्रिजरेटर बघता ते पूर्ण रिकामे आहे,बाकी खाण्यासाठी स्वयंपाक घरात काही नाही,यावेळी तुम्ही काय करणार?तुम्हाला भूक लागली घरात काही नाही,तुम्ही दुकानात जाणार,मित्रांच्या घरी,हॉटेल मधी जाणार??
         तुम्ही दुकानात जातात पण  तिथे गेल्यावर समजते ते दुकान बंद असते.फास्ट फुड सेंटर मध्ये जातात पण काही कारणामुळे ते पण बंद असते.मित्राचा घरचा दरवाजा बंद असतो.हॉटेल मध्ये जातात तर तिथे वेळ लागणार असतो,आता तुम्हाला खूपच भूक लागली,अशा वेळी तुम्ही काय करणार,घरी परत जाणार,दुसऱ्या दुकानात जाणार,तुम्ही काय करणार??
        बरोबर, आपल्या आयुष्याबद्दल पण असेच आहेत.आपण जगायचे कसे ते पूर्णपणे आपल्या हातात आहे,वरील गोष्टीवरून तुम्ही जर प्रयत्न करणे सोडले तर तुम्ही थांबले,तुम्ही भुकीच असणार,यात नुकसान आपलेच होणार बाकी जग आपल्यासाठी थांबले नाही ते पुढे जातच राहणार.
      तसेच आपल्या यशाबद्दल,भविष्याबद्दल,स्वप्नासाठी ,आपल्या आनंदासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे,कितीपण संकटे आली तरी त्यावर मात करून आपण पुढे गेलेच पाहिजे.आपण आपल्या स्वप्नसाठी स्वप्नाच्या मागे गेलेच पाहिजे.
    आता तुम्ही तुमच्या स्वप्नाचा विचार करा,ते मिळविण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहे त्या लिहून ठेवा.आणि जसे तुम्हाला भूक लागली तेव्हा तुम्ही जसे प्रयत्न केले तसेच आता आपल्याला आपल्या स्वप्नासाठी करायचे आहे,मग कितीपण दुकान/दरवाजा बंद असुद्या, कितीपण संकटाचे डोंगर  समोर आले तरी चिकाटीने, न हार मानण्याचा दृष्टीकोन तयार ठेवायचा.
      ह्या सर्व गोष्टी करतांना समस्या अशी आहे ,जेव्हा आपण प्रयत्न करत राहणार, तेव्हा आपण एका प्रकिया मधून जात असतो,जसे की एक उदाहरण संभाषण कौशल्य विकसित करायचे त्यासाठी  तयारी करतांना  जेव्हा आपल्यात काही चुकी झाली  तेव्हा आपलेच  मित्र आपल्याला हसणार ,नावे ठेवतील,चेष्टा करणार,आणि अशावेळी आपण निराश होऊन ती गोष्ट करण्याची टाळाटाळ करतो आणि आपण तिथे थांबतो.ह्या सारख्या खूप गोष्टी आपल्या सोबत घडेल,तेव्हा तिथे थांबू नका त्या गोष्टीला दुर्लक्ष करून पुढे चालत राहा,कारण जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा तेच लोक आशेने आपल्याकडे येतील आणि आपल्याला बोलतील 'सर,आम्हला पण मार्गदर्शन करा ना तुम्ही कसे हे यश मिळवले.
 सांगायचे तात्पर्य - कितीपण दरवाजे बंद असले आयुष्यात तरी आपण प्रयत्न करणे सोडायचे नाही आपल्यासाठी एक तरी दुकान उघडे असणार.......

तर मग कसा वाटला हा लेख नक्कीच कळवा म्हणजे अजून जास्त करण्यासाठी माझी पण हिम्मत वाढेल
आवडला तर लाईक ,शेअर,कंमेंट  करा.

आणि मित्रांनो आपल्या मातृभूमीसाठी पण वेळ काढा,आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपली गरज आहे,आपली संस्कृती जोपासा.आपल्या तरुण पिढीला बाहेरील आपले शत्रू राष्ट्र ह्या सोशल मीडिया सारख्या गोष्टीमधी आटकून ठेवत आहे,आणि आपण त्या गोष्टीच्या आहारी जाऊन आपले आयुष्य वाया घालवतोय.


-संकेत (शिवाजी हेमलता) गायकवाड
Do for India Vision 2020

#Future Of Tomorrow India🇮🇳



Previous Blogs✍️

https://sanketgaikwad1.blogspot.com/2019/05/i-am-change.html?m=1

https://sanketgaikwad72.blogspot.com/2019/04/blog-post_21.html?m=1

स्वप्न- एक जादू


'स्वप्न' -आयुष्य परिपूर्ण जगण्यासाठी!
एक स्वप्न तयार करा ,त्या स्वप्नसाठी जगा.नक्कीच त्या स्वप्नाला सत्यात आणण्यासाठी वेळ लागेल ,थेंब थेंब पाण्याने जसे तळे भरते तसे आपल्याबद्दल पण आहेत दररोज कष्ट करायचे,त्रास पण होतो कष्ट घेतांना पण कष्ट करणे सोडायचे नाही.आपला पण तलाव भरेल,आणि जेव्हा भरेल तेव्हा आपण यशस्वी लोकांच्या यादीत असू.आणि जेव्हा आपले स्वप्न पूर्ण होते तेव्हा तो आनंद आणि समाधान वेगळ्याच स्तरावर असतो कारण ते स्वप्न आपण तयार  केलेले असते.
जेव्हा स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार तेव्हा ते अनुभवा त्याचा आस्वाद घ्या,पूर्ण त्या संकल्पना साठी जगा आणि तो आनंदच माणूस शोधत असतो जन्म घेतल्यापासून, त्याच्यासाठी च तो धडपड करतो एवढी आणि तो आनंद आपल्यातच असतो पण आपण तो दुसऱ्या गोष्टीमधी शोधत असतो.
एक स्वप्न तयार करायचे ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येक मिनिट,प्रत्येक क्षण त्या स्वप्नसाठी जगायच,त्याचाच विचार करायचा चालतांना -बोलतांना -झोपतांना -उठतांना आणि बघा शेवटी तुमच्या नावापुढे स्टार लागलेली असणार.
प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ लागतो त्या पूर्ण प्रक्रिया मधून जायला तेवढा संयम आपण ठेवला पाहिजे.
सर्व काही आपल्यामधी आहे,त्याचे आत्मपरीक्षण करा, ती गोष्ट कोणती ते ओळखा,माणसाने एकदा स्वतःला ओळखले तर त्याला कोणीही हरू नाही शकत.
आणि आपण एवढे कष्ट करतो ते कशासाठी? उत्तर जर आनंद असेल तर,आनंद आपण स्वतः शोधून काढायचा असतो तो आनंद कोणी देत नाही आणि त्यासाठी वेळ पण वाया नका घालू.


-Sanket Gaikwad
#Future Of Tomorrow India 🇮🇳

I am the change 🇮🇳

जर आपल्याला आपला देश महासत्ता करायचा असेल ना तर प्रत्येक व्यक्ती ने समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे.
आपला देशातील गरज असलेल्या लोकांसाठी आपल्याला काम करायचे आहे त्यांना मुख्य प्रवाहत आणायचे आहे .
इथे सरकार किव्हा नोकरशाही ला दोष देऊन चालणार नाही
आज गरज आहे ती स्वतः मधी बदल करायची.
भगत सिंग राजगुरू सुखदेव यांनी वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या जीवाचा विचार नाही करता आपल्या देशासाठी म्हणजे आपल्या आजच्या सुखासाठी त्यांनी बलिदान दिले असे अनेक वीर पुत्र होऊन गेले त्यांनी निस्वार्थ पणे काम केली आपल्या आज साठी
आज आपल्याला 73 वर्ष पूर्ण होऊन गेले  पण समाजातील त्या व्यक्तीना बाहेर नाही काढु शकलो गरिबी, शिक्षणाचा अभाव,जात धर्म , त्यांना आज गरज आहे आपली.आज पण आदिवासी पाडे बघा .

पण
आमचे भविष्य आमच्या तरुण पिढी मधी आहे हे आम्ही  पूर्ण जगाला सांगतो पण खरे तर आमची तरुण पिढी सोशल  नेटवर्क व्हाट्सअप्प,फेसबुक वर आणि अर्धी तर पब जी मधी आटकून बसली यातून त्यांना स्वतःसाठीच वेळ नाही भेटत.

बाहेर चे  जग असे आणि आपला भारत असा ,अशांनी तर पहिले देश सोडून जायचा,स्वतः काही करत नाही आणि जेव्हा वेळ येति तेव्हा आम्ही सुट्टी वर असतो

आमचे पुढारी,जवान शहीद झाले की असे भाषण करता आणि हा आता तर त्यावर निवडणूक पण लढवता आणि एकदा झाले की बघा म आमचे जवानाच्या घरचे कसे जगता ,हे सर्व समजते आम्हाला पण समजून नसते घेयचे ना कारन माझ्या घरचा थोडी शाहिद झाला मी status upload करून मी माझे काम केले
विचार करा त्यांच्या घरची
आई वडील- बायको-मुले.गरज आहे त्या शहिद कुटुंबातील व्यक्तींना साथ देयची.


आमच्या कॉलेज मधी शिक्षकासोबत ओळख असली म्हणजे प्रॅक्टिकल चे टेन्शन नसते मार्क्स भेटता आम्हला, अरे पण आज समस्या काय झाली देशात प्रॅक्टिकल नाही होत म्हणून त्याचे उद्याचे परिणाम बघा  आरधा महाराष्ट्र दुष्काळ सहन करतो,शेतकऱ्यांना आधुनिक गोष्टी माहीत नाही झाल्या पण आज BSC AGRI ला खूप डिमांड आहे बरका.
इंजिनिअर बद्दल नाही बोलले तेच योग्य कारण आमच्या गल्ली बोळात कॉलेज झाले आमच्या भाऊ ,दादा चे .

मला तरी वाटते अर्धे गुन्हेगारी आमच्या पोलिसांना चिरीमिरी देऊनच तयार होते , कारण हेल्मेट घालून आम्हला  आमचा चेहरा कसा दाखवता येईल
आणि पकडले तरी आहेच आमचे   आदर्श गुंड पुढारी सोडून द्या रे त्याला असे सांगायला

अधिकारी होईल म मी change करेल सिस्टीम, अरे पण तुला अधिकारी होऊन काय करायचे आहे याचे कारण शोध , का गरज आहे आपण अधिकारी होयची ते बघा.आणि अधिकारी झालो तरच करणार आहोत का आपण आपल्या देशासाठी! आणि नाहीच झाले तर मग काय?? अर्ध तर फक्त खुप पैसा कमवायचा यासाठीच येतात पण माफ करा असे स्वप्न असेल तर नका देशाची वाट लावू कारण हे पैसे सामान्य लोकांचे आहेत
आत्ता तर 100℅पण result लागतोय आमचे,पण फक्त कागदावर!
माझा देश सर्व गोष्टी संपन्न आहेत पण फक्त आम्हला कोणाला त्याची गरज आहे ते नाही समजत.


अता वाईट गोष्टी थांबणार
भ्रष्टाचार बंद होणार
गरिबाला न्याय भेटल
प्रत्येकाला त्याचा हक्क भेटलं
कारण आम्ही जन्म घेतला आहे उद्याचा भारत घडविण्यासाठी🇮🇳
- संकेत गायकवाड
7709903350
#Future Of Tomorrow  India 🇮🇳